प्रतिनिधी - देवळा : गणेश आढाव.





देवपूरपाडे येथे श्री सप्तशृंगी माता व निर्मला माता मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा सोमवार २९ एप्रिल ते बुधवार १ मे पर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या कार्यक्रमाचे आयोजन देवपूरपाडे येथील समस्त ग्रामस्थांनी केले होते, या कार्यक्रमात पहिल्या दिवशी शांतीसुक्त प्रायश्चित संकल्प, प्रधान संकल्प, श्रीगणेश पुष्पाहवाचनादी पंचांग कर्म आचार्यादि वरनं कुटीरहोम कुंडदेवता पुजन पुर्वक, अग्नीस्थापन, मुर्ती पुजन, जलाधिवास प्रासाद वास्तु मंडल, पुजन, योगीस्थापना क्षेत्रपाल स्थापना, प्रधान मंडल देवता स्थापना, नवग्रह स्थापना, रुद्र मंडल स्थापना, ग्रह हवन सायंपुजन स्तोत्रपठन, महाआरती. व देवीचा गोंधळ आदी कार्य करण्यात आले,
दुसऱ्या दिवशी शांतीसुक्त, स्थापित देवता पुजन, स्नपणविधी, शांतिक पौष्टीक हवन, तत्ववादी न्यास, मुर्तिपतीलोकपाल, होम धान्यादिवास शय्या निवास, सायंपुजन महाआरती
व तिसऱ्या दिवशी शांतीसुक्त, स्थापित देवता पुजन, मुर्तीन्यास, ब्रम्हशिला पुजन, मुर्ती प्राणप्रतिष्ठा स्थापन, महाअभिषेक, अर्चन कलश स्थापना, ध्वज स्थापना, उत्तरांग हवन, प्रायश्चित्त हवन, बलीदान, पुर्णाहूती, आशिर्वाद महानैवद्य
असे धार्मिक विधी करण्यात आले..
या कार्यक्रमासाठी महंत गणेशपुरी महाराज देव दरेश्वर पिंपळगाव, ब्रह्मवृंद मंगेश कुलकर्णी, विशाल कुलकर्णी यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा