उमराणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी भरत देवरे यांची बिनविरोध निवड

 देवळा: ज्ञानेश्वर आढाव
         उमराणे : येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भरत काशिनाथ देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.आवर्तन पध्दतीनुसार माजी उपसरपंच प्रशांत (बंडु) देवरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परिणामी रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच कमलताई देवरे यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. उपसरपंच निवडीसाठी बिनविरोध निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या अनुषंगाने भरत देवरे यांचे नाव सदस्य स्मिता देवरे यांनी सुचविले. त्यास रेखा जाधव यांनी अनुमोदन दिले. परिणामी निर्धारित वेळेत भरत देवरे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणुुक निर्णय अधिकारी व ग्रामसेवक आर.पी.अहिरराव यांनी देवरे यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवड झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी ग्रा.प.सदस्य  प्रशांत (चंदु ) देवरे, रंजना पवार, विष्णु सोनवणे, सचिन देवरे, विमल देवरे, सिमा गोधडे, वंदना देवरे, छाया देवरे, स्मिता देवरे, बापु जमधाडे, विलास देवरे, विश्वनाथ देवरे, प्रशांत देवरे, रेखा जाधव आदिंसह मालेगाव शेतकी संघाचे अध्यक्ष संंदीप देवरे, दिलीप नाना देवरे, भाऊसाहेब देवरे, भिला देवरे, भगवान देवरे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिपक देवरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पण्या