देवपूरपाडे येथे देवळा तालुक्यातील ५०० बांधकाम कारागिरांना आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते संसार उपयोगी वस्तूंचे वाटप
महालपाटणे | गणेश आढाव
दिनांक २७ देवपूरपाडे (ता. देवळा)येथे बांधकाम मजुर व कारागीर यांना विविध संसार उपयोगी वस्तूंचे वाटप चांदवड देवळा तालुक्याचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अभिमन अहिरे हे होते. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवा बापु वाघ, भाजपा देवळा तालुका अध्यक्ष श्री. किशोर आहेर, मा. श्री . प्रमोद दादा पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. थोरात साहेब, तहसीलदार श्री. मिलींद कुलकर्णी, नायब तहसीलदार बबन अहिरराव,शारदा गावंडे (निरीक्षण अधिकारी महा.विभाग देवळा), आहेर मॅडम बांधकाम कामगार विभाग देवळा,श्री. सुकदेव आण्णा अहिरे, निरपूरचे माजी सरपंच श्री. भाऊसाहेब सुर्यवंशी, शशिकांत पवार, देवपुरपाडे ग्रामपंचायत सदस्य सविता सुभाष अहिरे, ज्योती मन्साराम , देवराम सदा पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा.चेअरमन वसंत अहिरे,
संचालक भास्कर बापु ठाकरे, माणिक अहिरे, डॉ.नाना भामरे, सुशिलाबाई आहिरे, यशोदाबाई आढाव, दगडू काका भामरे ,नाना आप्पा, बाजीराव सुर्यवंशी सर तसेच डोंगरगाव, मेशी,खालप, वासोळ येथील सरपंच उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन देवपुरपाडे ग्रामपंचायत सदस्य तथा देवराम सदा पाटील सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. अजय आहिरे, महालपाटणे ग्रामपंचायत माजी सरपंच श्री अरुण अहिरे, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच योगेश अहिरे यांनी केले.
तालुक्यातील पाचशे बांधकाम लाभार्थ्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच रमाई घरकुल योजनेचे बांधकाम आदेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष आढाव, विनायक अहिरे, हर्षद सुर्यवंशी, संदिप सुर्यवंशी, रमेश अहिरे, गणेश बच्छाव, सागर खरोले, सुरेश निकम, खंडेराव आढाव, ज्ञानेश्वर आढाव, संदिप जोंधळे, नाना आहिरे, सुनिल अहिरे, शशिकांत अहिरे, विष्णू बंदरे,केदा अहिरे, गोकुळ अहिरे, रवी शेवाळे यांनी केले.
सुत्रसंचलन प्रवीण सुर्यवंशी सर यांनी केले.तर आभार अजय आहिरे यांनी मानले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा