पी.इ.एस. इंग्लिश मिडियम स्कूल येथे भारतीय संविधान दिन साजरा

मालेगाव येथील विख्यात पी.इ. एस. इंग्लिश  मिडियम स्कूल येथे दि. २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक श्रीमान प्रशांत पाटील ,अँड. नियाज अह. लोधी , अँड शिशिर हिरे, कमलाकर पवार साहेब  हे आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य डि. के. आढाव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करण्यात आली. तदनंतर शाळेचे शिक्षक सर्वश्री विकी मांडवडे, दिलीप पाटील, दिलीप गांगुर्डे, डॉ. सुभाष वाघ सर,जमिर खान, शोमेला मिस आदिंची समयोचित भाषणे  झाली. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर   कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या