देवपूरपाडे : ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

*प्रतिनिधी देवळा गणेश आढाव*

           कार्यक्रमासाठी स्वामी समर्थ रामदास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक अध्यक्ष श्री.अभिमन देवराम अहिरे हे उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाघ जे.यू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आजी आजोबा पालक मेळावा घेण्यात आला. व मतदान जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. राजाराम दामू पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आहे म्हणून सर्व तरुण, वृद्ध,महिला यांना मतदानाविषयी महत्व सांगितले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी सहकार्य केले.

टिप्पण्या