पी.इ.एस. इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज मालेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मालेगाव (गणेश आढाव)रविवार 14 एप्रिल रोजी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मालेगाव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
   शाळेचे ज्येष्ठ शिक्षक डॉ.सुभाष वाघ सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकून त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि संविधान लेखनासाठी त्यांनी केलेले परिश्रम सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील घटना समितीने भारताला उत्कृष्ट राज्यघटना कशी दिली हे त्यांनी पुढे सांगितले आणि आता आपल्या संविधानाचे रक्षण करणे हे आम्हा भारतीयांचे कर्तव्य आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आढाव सर, समन्वयक विक्की पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक डॉ.सुभाष वाघ सर, सोनजे सर, जमीर खान सर, तेजश्री मिस, हिरे मिस आणि रेहान सर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या