पी इ एस इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मालेगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

*प्रतिनिधी गणेश आढाव*

                   महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
               प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर आढाव सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री. डॉ. सुभाष वाघ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
                तसेच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती आपल्याला मनोगतातून व्यक्त केली. तसेच एका विद्यार्थ्याने गीत सादर करुन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. 
              आजच्या कार्यक्रमाचे आकर्षक ठरले छत्रपती शिवाजी महाराज , माॅ साहेब जिजाऊ यांची वेशभूषा करून आलेले लहान मुलं व इयत्ता दहावी व नववीच्या मुलींनी सादर केलेले लेझीम नृत्य.
                  यावेळी कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व संस्थेचे समन्वय विकी मांडवडे व तसेच शाळेतील शिक्षक श्री. दिलीप गांगुर्डे, सोनजे सर , रिहान सर , जैन सर , जमिर सर, अहिरे मॅडम, हिरे मॅडम, शोमिला मॅडम , शोएबा मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप गांगुर्डे सर यांनी केले व आभार श्री. विकी मांडवडे सर यांनी मानले

टिप्पण्या