केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या धनगर आरक्षणाला विरोधी धोरणामुळे भाजप देवळा तालुका पदाधिकाऱ्याचा राजीनामा
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी धनगर आरक्षणाला विरोध केल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आढाव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पवार यांच्या वक्तव्यामुळे धनगर समाज नाराज झालं असून याबाबत आढाव म्हणाले लोकसभा निवडणुकी वेळी भाजपच्या प्रचारात झोकून घेऊन पक्षाच्या ध्येय धोरणेचा प्रचार व प्रसार केला. यात दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार व विद्यमान केंद्रीय राज्य मंत्री डॉ भारती पवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या.
त्या आज आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करीत आहेत. निवडणुकीच्या वेळी आम्ही समाजाने एक मताने मतदान केले. यासाठी समाजाच्या बैठका घेतल्या.
आज आमचा समाज अतिशय हलाखीचे जीवन जगत असतांना आमच्या आरक्षणाला ना डॉ भारती पवार ह्या विरोध करत असल्याने आम्ही सर्व समाज बांधव त्यांचा निषेध व्यक्त करीत असून मी व्यक्तिशः भाजयुमोच्या तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे तालूका अध्यक्ष योगेश ( नानू ) आहेर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा